E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पावसामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या आशा संपुष्टात
Wrutuja pandharpure
19 May 2025
बंगळुरु
: आयपीएलच्या १८ व्या हंगामातील स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली, पण पावसाच्या व्यत्ययामुळे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना अखेर रद्द करण्याची वेळ आली. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या स्पर्धेतील उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडणारा चौथा संघ ठरला आहे. दुसरीकडे एका गुणासह बंगळुरुच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. पण अजूनही त्यांना अधिकृतरित्या प्लेऑफ्ससाठी पात्र असल्याचा टॅग लागलेला नाही.
बंगळुरुच्या मैदानातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खात्यात १२ सामन्यानंतर ८ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह मिळालेल्या एका गुणांसह १७ गुण मिळाले आहेत. प्लेऑफ्सचा त्यांचा मार्ग सोपा झाला असला तरी गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचूनही या संघासह एकही संघ अद्याप प्लेऑफ्ससाठी अधिकृतरित्या पात्र ठरलेला नाही.विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. १४ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये अधिराज्या गाजवणार्या किंग कोहलीच्या सन्मानासाठी बंगळुरुच्या चाहत्यांनी खास शक्कल लढवल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीसाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खास माहोल तयार करण्यात आला होता. चाहत्यांनी १८ नंबरच्या व्हाइट जर्सीसह मैदानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहली मैदानात उतरला नसला तरी त्याच्या नावाच्या १८ नंबर जर्सीसह स्टेडियममध्ये चाहत्यांकडून विराट शक्ती प्रदर्शनाचा नजराणा दाखवून दिला. ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरतान दिसते.
या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १२ पैकी ५ सामन्यातील विजय आणि ६ पराभवासह ११ गुणांची कमाई केली होती. बंगळुरु विरुद्ध यंदाच्या हंगामातील त्यांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी या सामन्यातील एका गुणासह त्यांच्या खात्यात १३ सान्यानंतर १२ गुण जमा झाले आहेत. अखेरचा सामना जिंकला तरी ते १३ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. त्यामुळे त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. याआधी चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ स्पर्धेतून बाद झाले होते. आता घघठ च्या रुपात आता चौथा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून उर्वरित ६ संघात ४ जांगासाठीची स्पर्धा उरली आहे.
Related
Articles
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी